🌟मायनारिटीज एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर प्रा.डॉ.केशव जोंधळे यांची निवड....!


🌟महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.केशव जोंधळे यांचे सर्वस्थरातून होत आहे अभिनंदन🌟पुर्णा (दि.२१ जुन २०२३) -
पुर्णेतील नामांकीत संस्कृती महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.केशव जोंधळे सर यांची महाराष्ट्र राज्यातील मायनारिटीज शिक्षण संस्थाचालकांच्या मायनारिटीज एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशन या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे
.

मायनारिटीज एज्युकेशनल ट्रस्टीज असोसिएशन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.केशव जोंधळे यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे जेष्ठ रिपाई नेते तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाशदादा कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे,शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,जेष्ठ पत्रकार विजयजी बघाटे,जेष्ठ पत्रकारषजगदीश जोगदंड सर,माजी नगरसेवक सुनिल जाधव,दैनिक एकमचे पत्रकार सुशील गायकवाड,रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,शाहीर गौतम कांबळे,पत्रकार दिपक साळवे,किशोर सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या