🌟परळीचे शेख जरीन यांचा खून करणाऱ्या दोशी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करा....!


🌟वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी : राज्यात दलित मुस्लिम मातंग समाजावर वारंवार जीवघेणे हल्ले🌟

परळी (दि.१४ जुन २०२३) - परळी येथील शेख जरीन यांचा खून करणाऱ्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील शेख जरीन यांना चौकशीच्या नावाखाली पोलीस स्टेशनला नेऊन व त्यांच्या मुलासमोर प्रचंड मारहाण केली असता माझ्या वडिलांना मारहाण करू नका अशी विनवणी करीत असतानाही शेख जरीन यांना जनावरासारखी मारहाण करण्यात आली असून यामध्येच त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय अल्पसंख्यांकासह दलित मातंग समाजावर वारंवार जीवघेणे हल्ले होत आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा हातात घेऊन पायदळी तुडवून गोरगरिबाचे मुडदे पाडत आहेत. परळी येथील शेख जरीन यांचा खून करणाऱ्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून शेख जरीन यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असून आरोपींना तात्काळ अटक नाही करण्यात आल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजीत रोडे जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर तालुका अध्यक्ष गौतम भाऊ साळवे युवक तालुकाध्यक्ष राजेश सरवदे युवक तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते युवक तालुका उपाध्यक्ष अवि मुंडे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारशहा खान शेख एजाज भाई वंचित बहुजन आघाडीचे युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर युवक शहर महासचिव विनोद रोडे तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांची सह्या असून.याचे लेखी निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर . जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय बीड.पोलीस अधीक्षक बीड. माननीय अशोक हिंगे पाटील मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी. इत्यादीना ही दिले असल्याची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या