🌟परभणी येथील युवक बेपत्ता ; माहिती देण्याचे आवाहन.....!


🌟नवीन काहीतरी उद्योग सुरु करतो म्हणून घराबाहेर पडलेला ३३ वर्षीय निखील सुनिल जैन अद्यापही घरी परतला नाही🌟

परभणी (दि.०५ जुन) :  नवीन काहीतरी उद्योग सुरु करतो, असे घरी सांगून घराबाहेर पडलेला ३३ वर्षीय निखील सुनिल जैन अद्यापही घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे वडील सुनील हेमराज जैन (६० वर्ष) यांनी नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे तक्रार दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून कोणास याबाबत माहिती मिळाल्यास नानलपेठ पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

निखील जैन, रा. शिवाजी रोड, एसबीआय बँकेसमोर, परभणी हा २५ मे रोजी सकाळी ८ वाजता घरातून निघून गेला असून, आपण औरंगाबाद येथील फ्लॅटवर राहून औरंगाबाद, पुणे किंवा मुंबई येथे काहीतरी नविन उद्योग पाहतो, असे घरच्यांना सांगितले. मात्र त्यानंतर २५ मे पासून त्याचा फोन बंद असल्याची तक्रार त्याचे वडील सुनील जैन यांनी २७ मे रोजी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलीस स्टेशन येथे मिसींग क्रमांक २१/२०२३ दाखल केली आहे.

तरी निखील सुनिल जैन, (३३ वर्ष) रंग - गोरा, चेहरा - गोल, उंची ५.७ फूट असून, मजबूत बांधा असलेला अंगात टी शर्ट व पॅन्ट दाढी वाढलेली वर्णनाचा इसम कोणाला आढळून आल्यास त्यांनी नानलपेठ पोलीस स्टेशन ९१७२७२९१४६ किंवा सुनील जैन ९४२१८५९९८९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नानलपेठ पोलीसांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या