🌟गंगाखेड येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश सुरू.....!

 


🌟त्यासाठी १० जून ते ३० जून २०२३ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार🌟 

परभणी (दि.१४ जुन २०२३) : शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह कोद्री रोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूला गंगाखेड येथील वसतिगृहात एकूण ६० मुलींना शासन निर्णयानुसार मुस्लीम - २१, बौद्ध- १३, पारशी आणि शीख प्रत्येकी एक आणि ख्रिश्चन व जैन प्रत्येकी ३ आणि बिगर अल्पसंख्याक १८ याप्रमाणे प्रवेश द्यायचे आहेत. त्यासाठी १० जून ते ३० जून २०२३ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार असून, गरजू विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश नोंदणी  करण्याचे आवाहन अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहाचे प्राचार्य यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या