🌟पुर्णा नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी पदभार स्विकारताच नगर परिषद प्रशासन लागले कामाला....!


🌟मुख्याधिकारी पौळ यांच्या पुढाकाराकारातून शहरात स्वच्छ्ता अभियान राबवले जात आहे युध्दपातळीवर🌟


पुर्णा (दि.२४ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी पदभार स्विकारताच नगर परिषद प्रशासन लागले कामाला लागल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेतील प्रशासकीय कारभार सुधारण्याची दृष्टीने मुख्याधिकारी पौळ यांनी पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून शहरातील नागरी सुविधांसह स्वच्छतेच्या प्रश्नावर देखील त्यांची कार्यतत्परता आज शनिवार दि.२४ जुन २०२३ रोजी दिसून आली शहरातील स्वच्छते संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी स्वतः जातीने उपस्थित राहुन शहरात स्वच्छ्ता मोहीम राबवण्यास सुरुवात केली या स्वच्छता मोहिमेत  मुख्याधिकारी पौळ यांच्यासह नगर परिषदेच्या विविध विभागातील ४५ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.


    पूर्णा  मुख्याधिकारी युवराज पौळ ह्यांच्या पुढाकाराने व देणं समाजाचं परिवाराच्या सहकार्याने आज शनिवारी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्वचछता मोहीम राबवली शहरातील छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्यांची ढिगार साचली होती हा कचरा साफ करण्यासाठी स्वतः मुख्याधिकारी युवराज पौल,पाणी पुरवठा विभागाचे किरण गुट्टे, मुलतजीब खान, मुत्तेहार खान,बाबर खान, ए.जी.मस्के,उत्तम कांबळे,कैलास माकुलवार ,सिद्धार्थ गायकवाड,दीपक भालेराव, नयिम दरोगा,साहेब घुरखे, बालू खोसे, माया दामोदरे,शाहीन टीचर,लता सुर्यवंशी,सुनीता पाठक ,रश्मी पाठक,शाहीन फारुखी,आदी सहभाग घेतला.  देणं समाजाचं परिवाराचे डॉ.गुलाब इंगोले,डॉ.दत्तात्रय वाघमारे,डॉ.प्रेमचंद सोनी,डॉ.द्वारकादास झवर, अनंत राव वळसे,सुभाषचंद्र ओझा,दिलीप माने , डी.बी. जाधव,प्रा.गोविंद कदम,अड.बी.आर.लोखंडे,जब्बार सेठ थारा,नफी सेठ, प्रवीण शिंदे,सतीश टाकळकर ,सुरेश साळवे,आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या