🌟सहकाराच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो....!


🌟डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक औरंगाबादचे अध्यक्ष पी.बी.अंभोरे यांचे यांचे प्रतिपादन🌟


ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक चार जून 2023 ला भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र शाखेचे महासचिव पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पय्यावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक औरंगाबादचे अध्यक्ष माननीय पी.बी. अंभोरे औरंगाबाद येथील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी माननीय रमण तेलगोटे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता माननीय बी के आदमाने पूर्णा येथील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अपेक्षा बालचंद थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचे चेअरमन पी.बी अंभोरे यांनी बँकिंग क्षेत्रामधील विविध अनुभव विशद केले.

महाराष्ट्र बँकेचे झोनल प्रबंधक असताना शेतकरी कष्टकरी आदिवासी व सर्व सामान्य जनतेला शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्ज उपलब्ध करून दिले मदत केली त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अलीकडच्याकाळामध्ये खाजगीकरण कंत्राटीकरण यामधून सामाजिक न्यायाला सरकार छेद देताना दिसत आहे भारतीय राज्यघटनेची पाय मल्ली होताना दिसत आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव सामाजिक न्याय हे भारतीय राज्यघटनेचे मूलभूत तत्वाला हरताळ फासली जात आहे यामध्ये मूठभर लोकांचा फायदा होत आहे.

परंतु घटनाकाराला अभिप्रेत असलेलं लोककल्याणकारी राज्य संकल्पनेपासून राज्यकर्त्याच्या भूमिकेमुळे त्यांना अपेक्षित असलेलं परिवर्तन होऊ शकले नाही.महा मानव तथागत भगवान बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता माननीय बी के आदमाने यांनी बुद्ध धम्मतत्त्वज्ञान यावर प्रकाश टाकला.

औरंगाबाद येथील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी माननीय रमण तेलगोटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार यावर प्रकाश टाकला भारतीय राज्यघटना लिहीत असताना महामानव तथागत भगवान बुद्धांचे लोककल्याणकारी विचार डोळ्यासमोर ठेवले सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अपेक्षा बालचांद थोरात यांनी आरोग्याच महत्त्व विशद केले स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व दिले पाहिजे.असे ते म्हणाले.

यावेळी पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दशरथ थोरात संचालक पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा विहार समितीच्या वतीने   सत्कार करण्यात आला दहावी परीक्षेमध्ये प्राविण्‍यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पहार व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी जेष्ठ पौर्णिमेचं महत्त्व विशद केलं.गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार पाठीमागची भूमिका विशद केली.

कार्यक्रमास ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड पी.जी.रणवीर दिलीप गायकवाड आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुरज जोंधळे राम भालेराव नितीन सोनुले बौद्धाचार्य उमेश बरहा टे तसेच भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ  आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या