🌟परभणी तालुक्यातील दैठना पोलिसांच्या विरोधात तृतीयपंथीयांनी केली तक्रार....!


🌟दैठणा पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मागवून अन्यायग्रस्त तृतीयपंथीयांना न्याय द्यावा अशी मागणी🌟

परभणी (दि.१९ जुन २०२३) : परभणी तालुक्यातील दैठना पोलिसांनी काही तृतीयपंथीयांशी केलेल्या गैरवर्तनाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे रितसर तक्रार नोंदवली आहे.

            गंगाखेड रस्त्यावरील उमरी फाटा भागात तीन तृतीयपंथीयांवर दैठणा पोलिसांनी भीक मागितल्याबद्दल कारवाई केली तुम्ही खरंच तृतीयपंथी आहात का असे नमूद करीत गैरवर्तन केले असल्याचा आरोप या तृतीयपंथीयांनी प्रशासनास सादर केलेल्या निवेदनातून केला. दैठणा पोलिस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज मागवून अन्यायग्रस्त तृतीयपंथीयांना न्याय द्यावा अशी मागणी सुमेध सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केली. सुमन सोनटक्के, माहेरा शब्बो शेख,जीया मुस्कान शेख,संदीप कच्छवे, शब्बो शेख रसूल,प्रतिक्षा बागल,मुस्मान गुलाब शेख आदींच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या