🌟परभणी शहर चिटणीस पदी ॲड.सुवर्णाताई देशमुख तर उपशहर प्रमुख पदी सुषमाताई देशपांडे यांची नियुक्ती🌟
परभणी (दि.२५ जुन २०२३) - प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी शहर कार्यकारणीची बैठक काल दि. २४ जून २०२३ रोजी पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालय येथे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी शहर कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला असून सर्वानुमते पक्षाच्या परभणी शहर चिटणीस पदी ॲड. सुवर्णाताई देशमुख यांची तर परभणी उपशहर प्रमुख पदी सुषमाताई देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली.
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिले या वेळी पक्षाचे शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मिडिया प्रभारी नकुल होगे, बाळा नरवाडे, शेख बशीर, सय्यद युनूस इत्यादी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या