🌟पुर्णा तालुक्यातल्या आहेरवाडीतील २ जातीयवाद्यांनी इंस्टाग्रामवर बोगस अकाउंट तयार करून महापुरुषाबद्दल वापरले अपशब्द...!


🌟पुर्णा पोलीस स्थानकात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟 

पुर्णा (दि.२६ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील दोन समाज विघातक जातीयवाद्यांनी इंस्टाग्राम या सोशल मिडियावर 'ट्रोल किंग' या नावाचे बोगस अकाउंट तयार करून आहेरवाडी याच गावातील पुणे येथे स्थायिक झालेल्या तरुणाला चॅटिंग करतेवेळी जातीवाचक शिवीगाळ करीत महापुरुषांच्या विषयी अपशब्दांचा वापर करीत धार्मिक भावना दुखावल्याची घटना काल रविवार दि.२५ जुन २०२३ रोजी दुपारी ०४-०० ते ०४-३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटने संदर्भात संबंधित तरुणाचे वडील भारत बालाजी राऊत राहणार आहेरवाडी तालुका पुर्णा यांनी आज सोमवार दि.२६ जुन २०२६ रोजी पुर्णा पोलीस स्थानकात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेल्या फिर्यादीवरून या घटनेतील आरोपी सचिन खंदारे व श्रीकांत खंदारे यांच्या विरोधात कलम २९४,२९४ ए,३४ भादविसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६ सी सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत कलम ३(१) (आर),अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१) (एस) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात  आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या