🌟पुर्णा नगर परिषद स्वच्छता विभागाचा गलथान कारभार तुंबलेल्या गटारातले पाणी चक्क वाहू लागले रस्त्यावर...!


🌟शहरातील जागृक नागरिक तथा पत्रकार सुशील गायकवाड यांच्या एका फोनवर मुख्याधिकारी पौळ यांनी घेतली दखल🌟 


पुर्णा (दि.०८ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषद स्वच्छता विभागाचा गलथान कारभार जनसामान्यांंच्या आरोग्याशी खेळ करत असून शहरातील लहान मोठ्या नाल्यांची मान्सुनपुर्व साफसफाई होणे आवश्यक असतांना देखील या बाबत नगर परिषद स्वच्छता विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यामुळे तुंबलेल्या नाल्यातील गलिच्छ पाणी अक्षरशः रस्त्यांवर वाहतांना पहावयास मिळत आहे.


पुर्णा शहरातील सिध्दार्थ नगर परिसरातील अमोल कॉर्नर या ठिकाणी देखील असाच गंभीर प्रकार आज बुधवार दि.०८ जुन २०२३ रोजी येथील जागृक नागरिक तथा पत्रकार सुशील गायकवाड यांच्या निदर्शनास आला स्वच्छतेअभावी येथील नाली तुंबल्यामुळे नालीतील गलिच्छ पाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली रस्त्यावरुन येणाऱ्या जाणार्‍या नागरिकांना या गलिच्छ पाण्यातून जावे लागत असल्याने गायकवाड यांनी याची आपल्या मोबाईलवर शूटींग घेऊन पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांना पाठवली यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी क्षणाचाही विलंब न करता पत्रकार गायकवाड यांना फोन करुन संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांकडून नालीची साफसफाई करुन घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केल्यामुळे असे निदर्शनास येते की पुर्णा नगर परिषदेला श्री.युवराज पौळ यांच्या रुपात एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मिळाल्याचे या प्रकरणावरून सिध्द होत असून जागृक नागरिक/जनहीतवादी पत्रकार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यास सर्वसामान्य जनतेला निश्चितच न्याय मिळत असतो असे लक्षात येते...    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या