🌟वंचित बहुजन आघाडी आयोजित आजच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हावे - मिलिंद घाडगे

                 


🌟नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणा विरोधात आक्रोश मोर्चा🌟        

परळी (दि.२५ जुन २०२३) -वंचित बहुजन आघाडी आयोजित आजच्या जन आक्रोश मोर्चात हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केली आहे.            

 याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रा सह परळी तालुक्यात दलित मुस्लिमावर होणारे अन्याय अत्याचारात वाढ झाली असून परळी शहरातील पोलीस कोठडीतील जरीन खान मुस्लिम युवकाचा खून असेल रेनापुर येथील मातंग युवकांचा अमानुष खून करण्यात आला तर नांदेड येथील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांना जातीय वाद्या कडून बेसुमार मारहाण करण्यात आले असून त्यातच त्याचा जागी मृत्यू झाला आहे तसेच मुंबई येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून बलात्कार करण्यात आला अशा विविध घटनेच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून परळी येथे आज दुपारी बारा वाजता परळी पोलीस स्टेशन समोरून उपविभागीय कार्यालय येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते माननीय फारूक अहमद सर प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर तर एडवोकेट सर्वजित बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष जावेद भाई कुरेशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक युवक प्रदेश सदस्य अमोल भाऊ लांडगे जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा निघणार असून या मोर्चा त जास्तीत जास्त नागरिकांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्यासह जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर तालुका अध्यक्ष गौतम भाऊ साळवे युवक तालुका अध्यक्ष राजेश सरवदे शहराध्यक्ष गफारशहा खान युवक शहराध्यक्ष प्रेम जगतकर आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या