🌟योग्य नियोजन आणि कठोर मेहनत केल्यास यश हमखास मिळते - कु.अस्मिता कदम


🌟नीट च्या घवघवित यशा मुळे योगेश्वरी शुगर्स परिवारा कडून सन्मान🌟


पाथरी (दि.२१ जुन २०२३) :- अभ्यासात योग्य नियोजन,कठोर मेहनत घेतल्यास प्रत्येक जन यशस्वी होऊ शकत असल्याचे प्रतिपादन लिंबा येथील कु अस्मिता रामराव कदम या विद्यार्थीनीने नीट परिक्षेत सातशे विस गुणां पैकी सातशे गुण मिळवत देशात तेरावी रँक मिळवल्या बद्दल योगेश्वरी शुगर्स परिवाराने केलेल्या सन्मानाला उत्तर देतांना केले.

या वेळी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जीजा यांनी मंगळवार २० जुन रोजी कु अस्मिता रामराव कदम यांचा साखर कारखाना परिवाराच्या वतीने सत्कार केला. या वेळी पुढे बोलतांना कु अस्मिता म्हणाली की माझ्या आई-वडीलांनी माझ्यावर विश्वास ठेवत त्यांच्या स्वत:च्या आवडी-निवडी, अपेक्षा बाजुला ठेवत मला सर्वतोपरी मदत केली. गुरूजनांचे ही या यशात तेवढेच मोलाचे सहकार्य लाभले.परिवार,गुरूजन यांची मदत तर सोबतीला होतीच परंतु मी वेळेचे नियोजन आणि त्याला कठोर मेहनतीची जोड दिल्यानेच या परिक्षेत घवघवित यश मिळऊ शकले. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन आणि कठोर मेहनत घेतल्यास यात प्रत्येक  विद्यार्थी यशस्वी होऊ शकत असल्याचे मत व्यक्त केले.

या वेळी चेअरमन देशमुख यांनी  मनोगत व्यक्त करताना सांगितले की, योगेश्वरी शुगर लिंबा कामगाराच्या पाल्यांनी तसेच परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी कु. अस्मिता कदम हिचा आदर्श घ्यावा. तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना जास्त अभ्यासाचे दडपण न देता प्रायमरी स्टेज पासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी. सहसा पालक दहावीच्या नंतर आपला मुलगा काय बनवायचा हा विचार करतात परंतु सातवी पासून पुढे जर तयारी केली आणि आपल्या पाल्यावर लक्ष दिले तर  तेही अस्मिता सारखे गुणगौरवास पात्र ठरतील.  योगेश्वरी परिवार विद्यार्थ्याचे मनोधैर्य वाढवण्या साठी गुणवंत विद्यार्थ्यांचा कारखान्या मार्फत नेहमी सत्कार करण्यात येतो. परंतु आपल्या कारखान्याच्या परिवारातीलच कारखाना कर्मचाऱ्यांची मुलगी एवढ्या चांगल्या गुणांनी यश संपादन करते ही बाब अभिमानास्पद आहे. असेही ते म्हणाले. यावेळी देशमुख यांनी व्यसनमुक्ती साठी, कारखान्यातील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कामगाराने निर्व्यसनी राहायला हवे असे सांगितले. कोणी जर नशा पाणी करून ड्युटीला आला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सूचना दिली.

कु अस्मिता कदम ही याच कारखाण्यात असलेले टाईम किपर,लेबर ऑफिसर रामराव कदम यांची मुलगी आहे.आपल्या सहका-याच्या मुलीचा योगेश्वरी शुगर्स परिवाराने दणदनित कार्यक्रम घेत वाजत गाजत सत्कार करून सन्मान केला.या वेळी चेअरमन माजी आ आर टी देशमुख जीजा यांच्या सह या साखर कारखाण्याचे प्रमोटर लक्ष्मिकांत घोडे,सरपंच विष्णू चव्हाण,चेअरमन बालासाहेब सहजराव,कृउबासचे संचालक अशोक आरबाड,जनरल मॅनेजर चांदगुडे, वर्क्स मॅनेजर साखरे,चिफ केमिस्ट चौधरी,केन मॅनेजर चरमळ,ऑफिस मॅनेजर राजकुमारसिंह तौर,चिफ अकाऊंटंट रोडगे,स्टोअर किपर भंडारे,सुरक्षा अधिकारी हरकळ,चैतन्य महाराज,केन यार्ड सुपरवायझर जाधव,सिताफे,लक्ष्मणराव दुगाने,बाबासाहेब कदम,दगडू दुगाने,उप सरपंच बाळू पवार,नारायण राठोड,मंकाजी शिंदे,गजानन सपाटे,मोहनराव देशमुख,भरत हरकाळ,अरुन अरबाड,प्रदिप हारकाळ,हिंगे,पानझडे,बाबासाहेब दुगाने कृऊबास संचालक गणेश दुगाने,शेख अली.यांच्या सह कर्मचारी,कामगार,ऊस उत्पादक शेतकरी,तोड वाहतुक ठेकेदरआदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश शिंदे यांनी केले तर आभार राजकुमारसिंह तौर यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या