🌟जास्तीत जास्त योगसाधकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले🌟
परभणी (दि.२० जुन २०२३): जागतिक योग दिनानिमित्त उद्या (दि. २१) जून रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,जास्तीत जास्त योगसाधकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, शिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती आशा गरुड, शिक्षणाधिकारी(प्रा) विठ्ठल भुसारे उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ८:१५ वाजेदरम्यान योग साधना करण्यात येणार असून, याच वेळेत सर्व शाळा, महाविद्यालयात योग दिन साजरा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिले आहेत. मुख्यालयाच्या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमासाठी शहरातील प्रत्येक शाळेतील प्रत्येकी ५० मुले-मुलींचा सहभाग राहणार असून, सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांनीही योग साधनेत सहभागी होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.....
*****
0 टिप्पण्या