🌟मौ.हिंगला,वाडीदमई,नांदखेडा आणि करडगाव येथे शंखी गोगलगाय व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन🌟
परभणी (दि.२१ जुन २०२३) - परभणी जिल्हा/तालुक्यातील मौ.हिंगला,वाडीदमई,नांदखेडा आणि करडगाव येथे दि.२० जून २०२३ रोजी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री. विजय लोखंडे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. हरणे, प्रकल्प संचालक आत्मा, श्री. दौलत चव्हाण,उपप्रकल्प संचालक आत्मा, श्री. प्रभाकर बनसावडे , तालुका कृषी अधिकारी परभणी, श्री. नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, आणि श्रीमती. सुकन्या सातपुते कृषी सहाय्यक आणि कृषी विज्ञान केंद्र येथील डॉ अमोल काकडे शास्त्रज्ञ यांनी शंखी गोगलगाय व्यवस्थापन याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन हिंगला आणि वाडीदमाई येथील महिलांना केले बेलेश्वर शेतकरी बचत गट नादखेडा तसेच इतर गावातील शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेतकरी बैठक घेऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व प्रचार प्रसिद्धी तसेच पी. एम. एफ. एम. इ. गोगलगाय नियंत्रण व्यवस्थापन तसेच सोयाबीन पिवळा मोजॅक इत्यादी बाबत पोस्टर ग्रामपंचायत ला लावून गोगलगाय नियंत्रण व्यवस्थापन ची पॉम्पलेट सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले पी. एम. किसान बद्दल माहिती देण्यात आली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.....
0 टिप्पण्या