🌟भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक पूर्व तयारीच्या दृष्टीकोनातून लोकसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर..!


🌟परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख पदावर जिल्ह्यातील जेष्ठ नेते तथा मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकरांची यांची नियुक्ती🌟

परभणी (दि.०८ जुन २०२३) : भारतीय जनता पक्षाने निवडणूक पुर्व तय्यारी म्हणून रणनिती आखण्यास सुरुवात केली असून   आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वतीने लोकसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असुन परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

         गेल्या काही महिन्यांपासून या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून मोर्चोबांधणीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही सर्वच्या सर्व लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्या त्या जिल्ह्यातील प्रभावी व मातब्बर नेतेमंडळींच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हानिहाय लोकसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर  केली असून त्यात परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून बोर्डीकर यांची नियुक्ती केली आहे. शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते तर जालना जिल्ह्यात विजय अवताडे यांची नियुक्ती करण्यात आली असून बीड जिल्ह्यात राजेंद्र मस्के, धाराशिव जिल्ह्यात नितीन काळे लातूर मधून दिलीप देशमुख, नांदेडात व्यंकटराव गोजेगावकर, संभाजी नगरात समीर राजूरकर यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या