🌟यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.११ जुन २०२३) - येथील श्री गुरु बुध्दी स्वामी कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक व कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम, व संस्थेचे सहसचिव श्री गोविंद कदम हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी सांगितले की गेली ३९ वर्षापासून उत्कृष्ठ निकालाची परंपरा महाविद्यालयाने या वर्षी देखील कायम ठेवली त्यामागे महाविद्यालयात नियमित होणाऱ्या तासीका, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शिक्षकांची समर्पित भावना याच गोष्टी कारणीभूत आहेत.
संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या करतांना प्रतिपादन केले की या महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोई उपलब्ध आहेत त्यामुळेच शहरी भागातील मोठ्या आणि नावाजलेल्या महाविद्यालयांपेक्षा आमच्या महाविद्यालयाचा निकाल काकणभर सरस असतो. तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.बालाजी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गिरीश डावरे यांनी केले या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री उमाकांत मिटकरी, कार्यालय अधीक्षक श्री बालासाहेब कुलकर्णी क.महाविद्यालयातील व व्यवसायिक अभ्यासक्रमातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते....
0 टिप्पण्या