🌟पुर्णा नगर परिषद लेखा विभागातील लिपीक कैलास माकूलवार यांच्या गैरकारभाराची चौकशी करा...!


🌟सामाजिक कार्यकर्ते शेख अकरम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी🌟 

पुर्णा (दि.२५ जुन २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी गैरकारभारांची अनेक प्रकरण चव्हाट्यावर येऊन देखील संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या गैरकारभारावर सोईस्कररित्या पांघरूण टाकून त्यांना वाचवण्याचा गंभीर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाचा कारभार सुधारण्याऐवजी सातत्याने बिघडतच चालल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा पदभार नुतन मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी स्विकारल्यानंतर प्रशासकीय कारभारात हळुवारपणे बदल होतांना पाहावयास मिळत असतांनाच लेखा विभागातील लिपीक कैलास माकूलवार यांच्या गैरकारभाराचे प्रकरण समोर आला असून नगर परिषदेला कायमस्वरुपी लेखापाल असतांना देखील लिपिक पदावर कार्यरत कैलास माकूलवार नियमबाह्य पध्दतीने मोजमाप पुस्तकीवर स्वाक्षरी करण्यासह नगर परिषदेच्या बँकेतील खात्याला स्वतःचे मोबाईल नंबर लिंक करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते शेख अकरम यांनी त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पुर्णा नगर परिषद लेखा विभागातील लिपीक कैलास माकुलवार हे लेखा विभागात मागील दहा वर्षापासुन कार्यरत आहेत. त्याची इतर विभागात शासकीय नियमानुसार का बदली केली गेली नाही याची चौकशी करण्यात यावी कैलास माकुलवार हे मोजमाप पुस्तीकेवर अधिकार नसतांना सहाय्यक लेखापाल म्हणुन स्वाक्षरी कशी काय करतात ते पण तपासणे तसेच सहाय्यक लेखापाल म्हणुन त्यांना कोणत्या आधारे कोणी पदोन्नती दिली त्या आदेशाच्या प्रतीसह  ठराव प्रत देखील तपासण्यात यावी नगर परिषदेत कायमस्वरूपी लेखापाल असतांना कैलास माकुलवार हे नियम बाह्यरित्या स्वत:चा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर तसेच बँकेचे इंटरनेट बँकिंग पासवर्ड वापरून मर्जीतील गुत्तेदारांना निधीची माहिती देतात लेखा विभागातील य इतर महत्वाची कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर कशी काय घेवुन जातात ?

 पुर्णा नगर परिषद कार्यालयातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पुटेज तपासुन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी तसेच नगर परिषदेतील महत्वाची कागदपत्रे नियमबाह्य पध्दतीने बाहेर घेऊन गेल्या बाबत,साहाय्यक लेखापाल म्हणून बेकादेशीरपणे कामकाज पाहणे तसेच लेखापाल यांच्या गैरहजेरीत त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय इतर सुध्दा कामे करणे पुर्णा शहरातील नगर परिषद बोगस भरती प्रकरणात लेखा विभागात कार्यरत माकूलवार यांचा देखील सहभाग होता कारण त्यांनी पगारीच्या याद्या बनवलेल्या होत्या ? यामध्ये बोगस कर्मचाऱ्यांची देखील नावे समाविष्ट होती ? हि देखील त्यांनीच समाविष्ट केली होती याची देखील चौकशी करावी माकुलवार यांच्याकडे रोखपाल पदाचा सुध्दा कारभार असल्यामुळे बोगस भाडे पावती प्रकरणात त्यांचा सुध्दा सहभाग असून या प्रकरणातील आरोपीने जवाबात त्यांचे देखील नाव घेतल्याचे समजते रोजच्या रोज वसुली कारकुन यांच्या कडून वसुली जमा करताना त्यांना बोगस पावती बुक असल्याची संपूर्ण माहिती होती मग त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही ? 

पुर्णा नगर परिषदेतील लिपिक कैलास माकुलवार हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत परं त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होत नही असे दिसन येते अशा भष्ट कर्मचाऱ्यावर तत्काळ कार्यवाही करावी व शासन निर्णया नुसार इतर विभागात बदली करावी अन्यथा आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या