🌟केंद्रीकृत पोर्टलवर १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन🌟
परभणी (दि.२० जुन २०२३): केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२३ करिता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह कामकाज मंत्रालयाच्या www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार २०२३ साठी अर्ज, नामांकने करताना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे यांनी कळविले आहे.....
*****
0 टिप्पण्या