🌟जिल्हा शासकीय रक्तपेढी व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला सन्मान🌟
परभणी (दि.३० जुन २०२३) - प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी नुकतेच आपले १०१ वे रक्तदान करून रक्तदानाचे आपले शतक पूर्ण केले. याबद्दल तसेच रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल आज दि. ३० जून २०२३ रोजी रक्त केंद्र व रक्तपेढी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी येथे शिवलिंग बोधने यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या आयोजकांच्या सत्काराचा कार्यक्रम आज जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी येथे घेण्यात आला. याच कार्यक्रमात १०१ वेळा स्वेच्छा रक्तदान करणारे व आज पर्यंत ५० च्या वर रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचा डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, डॉ. अशोक बन, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. यादव चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. जयश्री यादव, अति. जिल्हा शल्य चिकित्सक तथा डॉ. सारिका बडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवलिंग बोधने यांनी त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी रक्तदानाला सुरुवात केली होती. ते दर तीन महिन्याला शासकीय रक्तपेढीत जावून रक्तदान करतात. शिवाय गरवंतांना व थॅलिसीमिया रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे.
आजच्या या कार्यक्रमात सत्कार कार्यक्रमात शिवलिंग बोधने यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, अंकुश गिरी, उध्दव गरुड, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, प्रल्हाद गरुड, पवन गरुड इत्यादी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या