🌟पुर्णा शहरातील मुख्य चौकांतील रस्ते झाले खड्डेयुक्त : नगर परिषद प्रशासन टेन्शन मुक्त ?


🌟निर्मनुष्य वसाहतींतील रस्त्यांवर कोट्यावधीं रुपयांच्या निधीची उधळपट्टी : शहरातील रस्त्यांवरील खड्डे मात्र ठरताय डोकेदुखी🌟  

पुर्णा (दि.३० जुन २०२३) :- पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून एकीकडे आवश्यकता नसलेल्या परिसरात विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून निकृष्ट व बोगस सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांची बांधकाम केली जात असल्याचे तर दुसरीकडे शहरातील चौक परिसरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असतांना देखील त्याकडे नगर परिषद प्रशासनातील धृतराष्ट्ररुपी अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा केविलवाना प्रकार पाहावयास मिळत असून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते महर्षी दयानंद चौक या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असतांना देखील याकडे नगर परिषद प्रशासनातील आधुनिक धृतराष्ट्रांचे लक्ष नसल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे रस्त्यांच्या आजूबाजूच्या दुकानांवर ग्राहकांना व येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर या खड्ड्यातून वाहने गेल्याने गलिच्छ पाणी  नागरिकांच्या अंगावर उडत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून पावसाळा लागण्यापूर्वीच  रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक असताना सुद्धा नगर परिषद प्रशासनाने या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे शहरातील अनावश्यक ठिकाणी विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करून नगरपालिका प्रशासनाने सिमेंट रस्ते व सिमेंट नाल्यांचे बांधकामे केली परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसर व पोलीस स्टेशन हा रस्ता अनेक गावांना  जोडणारा  प्रमुख रस्ता असून या रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्याचा अनागोंदी कारभार केल्याचे पहावयास मिळत आहे पूर्णा नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी युवराज पौळ या चौक परिसरात जोडणाऱ्या रस्त्याच्या झालेल्या दूर अवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवतील का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत असून सदरील रस्त्यांत खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. सदरील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी वाहनधारकासह नागरिकांतून होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या