🌟पंजाब राज्यात खुनासह दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीस नांदेड येथे अटक...!


🌟नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हें शाखेची धाडसी कामगिरी🌟

नांदेड (दि.१६ जुन २०२३) - पंजाब राज्यातील दक्षिण शहर पोलिस स्टेशन मोगा या ठिकाणी गुरनं.१०५/२०२३ कलम ३९४,३९६,३९७,४५९,३७९ भादवीसह कलम २५,५४,५९ शस्त्र अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदरील गुन्ह्यात पंजाब पोलिसांनाच्या तपासात निष्पन्न झालेला आरोपी हा पंजाब मधुन नांदेड येथे लपून बसला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक  द्वारकदास चिखलीकर यांना आरोपीस अटक करण्यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करुन पथकास आरोपीचा शोध घेणेसाटठी सूचना देवून रवाना केले.

दरम्यान आज शुक्रवार दि.१६ जुन २०२३ रोजी स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की पंजाब राज्यातील दक्षिण शहर मोगा पोलिसांना हवा असलेला आरोपी हा नगीनाघाट परिसरात वेश बदलून राहत आहे सदर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नगीनाधाट परिसरात जावून आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव गुरप्रितसिंघ ऊर्फ सोनू पिता गुरमितसिंघ (मजबी सिंग) वय ३८ वर्षं रा.गुमटाळा ता. अजनाळा जिल्हा अमृतसर राज्य पंजाब असे सांगितले सदर आरोपीस स्थागुशाच्या पथकातील पोलिसांनी वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याची त्याने कबूली दिली.

यावेळी पोलिस पथकाने आरोपीस ताब्यात घेवून पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शहर दक्षिण मोगा पंजाब येथील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून सदर आरोपीस नांदेड येथील मा. न्यायालयात हजर करुन आरोपीस पुरढील तपासकामी पंजाब राज्यात घेवून जाण्याची कार्यवाही चालू आहे.सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्र व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि पांड़ूरंग माने, पोउपनि जसंवत शाह, सपोउपनि माधव केंद्रे, पोना/ दिपक पवार, मपोना/किरण बाबर पोकोँ/। मारोती मौरे, मोतीराम पवार चापोको/ गंगाधर घुगे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा.पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या