🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद सीतारामआप्पा एकलारे हे होते🌟
पुर्णा (दि.११ जुन २०२३) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, नांदेड विभाग, अंतर्गत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा, अभ्यास केंद्र क्रमांक 87126 यांच्या तर्फे महाविद्यालयीन स्तरावर पदव्युत्तर पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्णा शहरातील तसेच आसपास च्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयातर्फे दोन वैशिष्ट्यपूर्ण एम. ए. इंग्रजी तसेच एम. कॉम. हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून सुरू करण्यात आले आहेत.
पहिल्याच वर्षी दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला यावर्षी 2023 मध्ये अभ्यास केंद्रातील पहिली बॅच पदव्युत्तर पदवी प्राप्त करून महाविद्यालयाच्या बाहेर पडत आहे याअनुषंगाने महाविद्यालय स्तरावर पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री प्रमोद सीतारामआप्पा एकलारे लाभले होते. याच बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव श्री गोविंदराव साहेबराव कदम यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य प्रा डॉ. संजय दळवी आणि श्रीमती शेख फतेमा यांची विशेष उपस्थिती होती. सर्व उपस्थीत मान्यवरांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ के राजकुमार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वरील दोन्ही अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले तसेच जे नियमित तसेच बाहेरगावी जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा जे नोकरी करतात काही गृहिणी आहेत पण त्यांना पदवी नंतर पुढे शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणे हा उत्तम पर्याय आहे असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता जमदाडे यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रसंयोजक डॉ. दिशा मोरे यांनी केले यामधे बोलतांना पूर्णे मधील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या पुर्वीच्या व्यवस्थापन समितीची भूमिका आणि हाच वारसा पुढे नेत सध्याच्या व्यवस्थापन समिती चे आभार व्यक्त केले, कोरोनाचा भयंकर परिस्थिती असताना देखील विद्यार्थ्यांनी सातत्य राखत अभ्यास पूर्ण केला त्याचे ही डॉ. दिशा मोरे यांनी कौतुक केले
कार्यक्रमामध्ये श्रीमती वर्षा पवार, कु. सलोनी राठोड, श्रीमती अश्विनी कदम तसेच कु. शकेरा सुलताना या विद्यार्थिनींनी अभ्यासकेंद्राबद्दलचे मनोगत व्यक्त करताना संस्थेचे, केंद्रप्रमुख तसेच केंद्र संयोजकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. राजकुमार उदगीरकर यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र समन्वयक डॉ. दिशा मोरे, समंत्रक डॉ. स्मिता जमधाडे, प्रा. राजकुमार उदगीरकर तसेच श्री गजानन भालेराव आणि श्री कालिदास वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी अभ्यासकेंद्रचे सर्व समंत्रक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या