🌟‘नशामुक्त भारत पंधरवडा’ निमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन.....!


🌟समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले🌟

परभणी (दि.१४ जुन २०२३) : नशामुक्त भारत पंधरवड्यानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते २६ जूनदरम्यान जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत पारित ठरावानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस ड्रग्स ॲब्युज आणि बेकायदेशीर तस्करीविरुद्ध आंतराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणून घोषित केला होता. त्यानुसार दरवर्षी २६ जून रोजी आंतराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरीधी दिन साजरा केला जातो. त्यामुळे नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या सहाय्याने समयबद्ध कार्यक्रमाअंतर्गत आंतराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवडा दि. १२ ते २६ जूनदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. 

त्यामध्ये उद्घाटन, ई-प्रतिमा मोहीम, जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, पथनाट्यद्वारे जनजागृती, विद्यार्थ्यांना घेऊन नशामुक्त केंद्राला भेट देणे, चित्रकला स्पर्धा कार्यक्रम समारोप इत्यादी कार्यक्रम सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी मार्फत तसेच अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचारी, शासकीय वसतिगृहातील गृहपाल, निवासीशाळेतील मुख्याध्यापक तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहेत, असेही श्रीमती गुठ्ठे यांनी कळविले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या