🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟'आदिपुरुष' चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्या जीवाला धोका, मुंबई पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी🌟

✍️ मोहन चौकेकर

* एमपीएससी परिक्षेत राज्यांमध्ये तिसरी आलेल्या दर्शना पवारचा संशयास्पद मृत्यू, राजगड पायथ्याशी सापडला मृतदेह, सोबत असलेला मित्र फरार , घातपात झाला असल्याची चर्चा. 

* भारताच्या U-23 महिला कुस्तीपटूंचा ताफा भारतात परतला; किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत जिंकली तब्बल 9 पदके. 

* राज्यात 2022-23 या वर्षात आली सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक; केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाचा अहवाल.

* छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा देशाची गुप्तचर संस्था 'रॉ'चे नवे प्रमुख, रवी सिन्हा यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार, भोपाळमध्ये दोन वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा.

* संत निवृत्तीनाथांची पालखीचा आज कर्जत शहरात मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी पारगावला मुक्कामी; राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे करत आहेत मार्गक्रमण. 

* महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कौशारी यांना 21 जुन जगभरात गद्दार दिवस साजरा व्हावा म्हणून लिहिले पत्र.

* 88 हजार कोटी रुपयांच्या (176 कोटी नोटा) नोट घोटाळ्याची जेपीसीकडून चौकशी करा ; नाना पटोले यांची मागणी.

* कोल्हापुरात धक्कादायक घटना: कोल्हापुरात राजेंद्रनगरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोघांनी घेतली इमारतीवरुन उडी, एकाचा जागीच मृत्यू.

* 'आदिपुरुष' चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्या जीवाला धोका, मुंबई पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी; चित्रपटावर बंदीची मागणी

* नागपूरमध्ये कार आतमधुन लाॅक झाल्याने जीव गुदमरून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू. 

* कोल्हापूरच्या सिद्धार्थची गरुडझेप, कुस्तीत सातासमुद्रापार पटकावले सिल्व्हर मेडल.

* 'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या आला भेटीला.

* Apple कंपनीकडून मे महिन्यात 10,000 कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात.

* आदिपुरुषमुळे 'नेपाळ' वासी संतापले, काठमांडूमध्ये सर्व भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी.

* बळीराजाचे लक्ष आभाळाकडे, खरिपांची पेरणी न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त.

* कर्मचाऱ्यांचे Work From Home करणार बंद; Infosys चा मोठा निर्णय 

* नाशिकच्या किकवी धरणाला मिळाली चाल, राज्य शासनाच्या नियमक मंडळाच्या बैठकीत निर्णय.

* 2000 च्या नोटांचा मागे घेण्याच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था होणार 'सुपर चार्ज' ; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा.

* मुंबईत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 'आदिपुरुष' चित्रपटाचा खेळ बंद पाडला.

* महाराष्ट्रातील हवामान अंदाज: मुंबईत मान्सून येत्या 72 तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता,  हवामान विभागाची माहीती; पुढील 5 दिवसांत अनेक ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा

* यूज अरेना इंडिया ट्विटर हँडलचं  भाकीत - विधानसभा निवडणुकीत भाजपला 123 ते 129, शिवसेनेला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना 12 जागा मिळणार असल्याचं भाकित.

* मोठा रेकॉर्ड : ऑलिम्पियन सी ए भवानी देवीने इतिहास रचला; आशियाई तलवारबाजी स्पर्धेत भारताचे पहिले पदक, चीनच्या वूशी येथे कांस्यपदकाची कमाई.

* सर्वात मोठी विमान खरेदी: इंडिगोने 500 एअरबस A320 फॅमिली विमानांची दिली ऑर्डर, कोणत्याही एअरलाइनने केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी एकल विमान खरेदी

* शेअर बाजार: सेन्सेक्स 216.28 अंकांनी आपटून 63,168.30 अंकांवर बंद, तर निफ्टी 70.55 अंकांनी घसरून 18,755.45 अंकांवर बंद

* सोन्याचे आजचे दर : मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55070 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60070 रुपये.

* आदिपुरुषची जबरदस्त कमाई: ‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रदर्शित झाल्यापासून 3 दिवसांत वर्ल्ड वाईड 340 कोटी रूपयांची कमाई, चित्रपट 5 भाषांमध्ये झाला आहे प्रदर्शित.

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या