🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड वगळता सर्व आठ तालुक्यातून पात्र गोशाळांचे अर्ज १९ जुलै पर्यंत मागविण्यात येत आहेत...!


🌟गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी प्रस्ताव पाठवण्याचे उपायुक्त डॉ.पी.पी.नेमाडे यांचे आवाहन🌟

परभणी (दि.१७ जुन २०२३): शासन आपल्या दारी उपक्रमांच्या माध्यमातून राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड वगळता सर्व आठ तालुक्यातून पात्र गोशाळांचे अर्ज १९ जुलैपर्यंत मागविण्यात येत आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

      या योजनेचा उद्देश्य, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, परभणी आणि संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. 

     यापूर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी सादर केले आहेत, त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पुर्णा, पालम आणि सोनपेठ या आठ तालुक्यातून इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्यामार्फत चार प्रतीत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन डॉ. नेमाडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या