🌟उत्पादन वाढीसाठी बीबीएफ चा अवलंबन करणे गरजेचे - डॉ.गजानन गडदे


🌟खरीप पेरणीपुर्व शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले🌟


परभणी (दि.०१ जुन २०२३) - परभणी तालुक्यातल्या मौ.धार येथे काल दि.३१ मे २०२३ रोजी खरीप पेरणीपुर्व शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये डॉ.गजानन गडदे कृषी विद्यावेत्ता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गडदे म्हणाले की शेतकऱ्यांनी  सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने करणे गरजेचे आहे या पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमाने होते तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एकरी बियाणे कमी लागते आणि उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते या पद्धतीने मूलस्थानी जलसंवर्धन होते. या व्यतिरिक्त सोयाबीनची बीज प्रक्रिया खत व तन व्यवस्थापन शंकी गोगलगाय व्यवस्थापन,  इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसरण केले, तसेच स्वाती घोडके यांनी माती नमुने घेण्याची पद्धत आणि माती परीक्षणाचे महत्त्व आणि सोयाबीन उगवण क्षमता तपासणी करूनच बियाणं पेराव तसेच पाच टक्के निंबोळी अर्क कशाप्रकारे तयार करावे आणि त्याचा फायदा काय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, धार या गावातील आत्मा अंतर्गत गटातील शेतकरी तसेच इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, रिलायन्स फाउंडेशन चे श्री.रामा राऊत  आणि विद्यापीठाचे श्री नितीन मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या