🌟जिंतूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गोंधळ....!


🌟आदर्श शाळेच्या मुख्याध्यापकांना आरेरावी केल्यांचा आरोप🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी व शिक्षक यांच्यात पुस्तक वाटप व शालेय व्यवस्थापन समितीच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता यावेळी शिक्षकांनी  गटशिक्षणाधिकारी यांनी पैशाची मागणी व अरेरावी केली असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी काही शिक्षकांनी गटसाधन केंद्र गाठून गटशिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी अशी मागणी करत होते परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काहीच वाईट बोललो नसल्यामुळे माफीचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले.

शहरातील गटसाधन केंद्रात आज दिनांक 15 जून रोजी दुपारच्या सुमारास शाळेच्या पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांचा गोंधळ पाहण्यास मिळाला मागील काही दिवसांपासून गटशिक्षणाधिकारी  गणेश गाजरे चर्चेत आले आहेत गटशिक्षणाधिकारी नेहमी शिक्षक व मुख्याध्याक यांच्या सोबत अरेरावी भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगण्यात येत आहे असाच प्रकार आज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात झाला यावेळी म्हाळसा सावंगी येथील शिक्षक चव्हाण हे गटशिक्षणाधिकारी गाजरे यांच्याकडे शालेय व्यवस्थापन समितीच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन मागण्याचे पत्र घेऊन कार्यालयात आले असता गटशिक्षणाधिकारी गाजरे यांनी तुच्छ वागणुक देत जोराने ओरडत कार्यालयातुन बाहेर व्हा  म्हणून अपमानीत केल्याचे आरोप केला दरम्यान गटसाधन केंद्रात गोंधळ निर्माण झाल्यामुळे शिक्षक गट साधन केंद्रात जमा होऊन गटशिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी म्हणून मागणी जोर लावून धरली होती यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गोंधळामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

----------------------------------------------

संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व  शिक्षक वेळेवर काम करत नाही मी  काही चुकीचे बोलो नाही त्यामुळे मी माफी मागायचा विषयच येत नाही 

--  गणेश गाजरे गटशिक्षणाधिकारी जिंतूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या