🌟जिंतूर येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे शुक्रवारी १६ जुन रोजी आयोजन....!


🌟नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार परेश चौधरी यांनी केले आहे🌟

परभणी (दि.१४ जुन २०२३) : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सतत चकरा माराव्या लागू नये. त्यांना शासकीय योजना सहज आणि एकाच छताखाली उपलब्घ व्हाव्यात यासाठी तहसील प्रशासनाने शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि.१६) जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालय, शिवाजी नगर, जिंतूर येथे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार परेश चौधरी यांनी केले आहे. 

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत जिंतूर तालुक्यात शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत शुक्रवारी सकाळी ९ वाजता एकत्रित विविध योजनाचे लाभ देण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, विविध दाखले (जात) प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ई-सातबारा वाटप व फेरफार पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा जॉब कार्ड, रमाई आवास योजना, सिंचन विहीर, मातोश्री पांदन रस्ते, नगर परिषदेमार्फत दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी विभागामार्फत एमआयडीएच, स्टेट अॅग्रीकल्चर मेकनायझेशन स्किम, सब मिशन ऑन अॅग्रीकल्चर मेकनायझेशन, आरकेव्हीवाय मेकनायझेशन, पीक प्रत्यक्ष (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान) योजना, आत्मा अंतर्गत स्थापित गट योजना, फळबाग लागवड, पोकराअंतर्गत तुती लागवड रोप वाटीका, तसेच इतर शासकीय कार्यालयामार्फत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

तरी या उपक्रमाचा सर्व नागरिकांना लाभ देण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि. १६) रोजी सकाळी ९ वाजेपासून माऊली मंगल कार्यालय, शिवाजी नगर, जिंतूर  येथे तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार परेश चौधरी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या