🌟तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाने केला त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला,पगडी,शिरोपा देवून सत्कार🌟
नांदेड (दि.११ जुन २०२३) :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ.पी.सी.पसरीचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....
0 टिप्पण्या