🌟एकल महिलांनी स्वतः गृह उद्योग निर्माण केल्यास मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील - प्रेरणा ताई वरपुडकर


🌟मनीषा भाग्यवंत यांनी द्रोण बनवण्याची मशीन स्वतः विकत घेऊन गृह उद्योग सुरू केला या उद्योगाला त्यांनी आज भेट दिली🌟


पाथरी (दि.२७ जुन २०२३) - पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी पाथरी मतदार संघाचे आमदार माननीय सुरेशरावजी वरपूडकर यांच्या सुनबाई प्रेरणाताई वरपूडकर यांनी कासापुरी येथील सावित्रीबाई एकल महिला संघटनेच्या मनीषा भाग्यवंत यांनी द्रोण बनवण्याची मशीन स्वतः विकत घेऊन गृह उद्योग सुरू केला या उद्योगाला भेट देण्यासाठी आल्या असता त्या बोलत होत्या.


पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महिलांनी आपल्या  घरात न बसता आपल्या मुलांचे आरोग्य, शिक्षण व बचत याकडे जास्तीचे लक्ष देवून आपली आर्थिक प्रगती करून आपले कुटुंब प्रमुखाची जबादारी पार पाडावी असेही यावेळी बोलताना म्हणल्या या एकल महिलांच्या निर्धार बैठकीला कासापूरी येथील सरपंच श्री विष्णू भाऊ कोळसे,ग्राम पंचायत चे सद्धस वाहेद खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा वैराळे माजी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब वाघमारे, जगदीश भाऊ कोल्हे, शालन बाई ज्ञानोबा वैराळे, द्रोपदी सुदाम वैराळे, मनीषा सिद्धार्थ भाग्यवंत, मालन शाहू भाग्यवंत, तसेच सावित्रीबाई एकल महिला संघटनेच्या पाथरी तालुका अध्यक्ष उषाताई यादव, एकल महिला संघटनेचे प्रमुख रघुनाथ कसबे व इतर महिला पुरुष उपस्थित होते

बैठक संपल्यानंतर प्रेरणा ताई वरपुडकर  यांनी द्रोण मशीनचे उद्घाटन करून मनीषा भाग्यवंत यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या