🌟पाथरी तालुक्यातल्या पेठ बाभळगाव येथील सौ.निता घोरपडे यांची गटविकास अधिकारी पदी निवड....!


🌟पेठ बाभळगाव येथील ग्रामस्थांकडून सौ.निता घोरपडे यांचा सत्कार🌟

पाथरी (दि.१४ जुन २०२३) :- लोकसेवा आयोगानेनुकत्याच जाहिर केलेल्या निकालात पेठ बाभळगाव येथील सौ निताताई अनंतराव घोरपडे/भरोसे यांची गटविकास अधिकारी पदी (बि डी ओ) निवड झाली  असुन गावच्या सुनेचे सत्कार करत ग्रामस्थांनी सन्मानित केले.

सौ निता अनंतराव घोरपडे,पती अभियंते अनंता घोरपडे हे दाम्पत्य स्पर्धा परिक्षेतुन उच्च पदस्थ अधिकारी होण्या साठी प्रयत्न करत होते. नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगाने जाहिर केलेल्या निकालात सौ निता यांना रगटविकास अधिकारी पदी निवड झाल्याचे वृत्त गावात समजताच ग्रामवाशियां मधून सौ निता यांचे गोड कौतुक झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचा सह गावातील महिला मंडळींनी सौ निता घोरपडे पती अनंता घोरपडे यांचा सत्कार केला. या शिवाय गावातील अनेक मान्यवरांनी या दाम्पत्याचा सत्कार केला. यात सरपंच रुक्मिण माणिकराव रणेर,उपसरपंच धर्मराज आव्हाड,ग्रा वि अधिकारी मानोलीकर,सह शिक्षक अशोक हरकळ यांची उपस्थिती होती तरअक्षरांगण प्रि प्रयमरी स्कुल येथे संस्थाध्षक्ष सुर्यकांत नाईकवाडे,श्रिकात नाईकवाडे,अलका नाईकवाडे,सुरज गिराम,ज्ञानेश्वरी नाईकवाडे,इत्यादिंनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या या शिवाय सर्जेराव गिराम,प्रतिभा गिराम,कुंडलिकराव सोगे,सोपान सोगे,भगवान सोगे,विठ्ठल आबा गिरा,भागवत गिराम,वसंत गिराम,आण्णासाहेब रणेर,गणेश रणेर,संजय रणेर,केतन गिराम,सुरेश गिराम, माऊली घोरपडे,गणेश गिराम,आशोकराव गिराम,श्रिकिशन गिराम,संजय गिराम,श्रीधर गिराम,मारोतराव गिराम,संतोष रणेर,आशोक गिराम,सुंदरराव गिराम आदि महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी वैयक्तीक सत्कार करत शुभेच्छा दिल्या. सखुबाई लटपडे यांनी ग्रामपंचायतीत महिलां साठी गायन करत शुभेच्छा दिल्या. या वेळी महिला ग्रामसंघाच्या महिलांची मोठ्या संखेने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या