🌟पुर्णेतील क्रांतीनगर,अलिनगरातील नागरीकांच्या समस्या घेऊन प्रहार जनशक्तीचा नगर परिषदेवर धडकला जनआक्रोश मोर्चा...!

   


🌟जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन🌟 


                                    
पुर्णा (दि.२६ जुन २०२३) :- नगर परिषद कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्ष शहर शाखेच्या वतीने जन आक्रोश हंडा-लोटा मोर्चा काढण्यात आला, अली नगर व क्रांती नगर येथे सार्वजनिक सौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, वस्तीत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करून सार्वजनिक बोरवरील अनधिकृत कब्जा उठविण्यात यावा, विद्युत पोलवरील बंद असलेले पथदिवे चालू करण्यात यावेत, घंटा गाडीची फेरी नियमित चालू करण्यात यावी, नोटरी दस्त अधारे खरेदी केलेली राहती जागा रिव्हिजन रजिस्टरवर नोंद घ्यावी, कच्च्या घरात राहणाऱ्या व बेघर असलेल्या लाभार्थ्यांना  घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, गल्लो-गल्ली पक्के रस्ते व नाली बांधकाम करण्यात यावे, सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक समाजमंदिर बांधून देण्यात यावे, अलीगर येथे अंगणवाडी चालू करण्यात यावी, क्रांती नगर येथे प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, इत्यादी मागण्याचे निवेदन  दि.26जुन रोजी प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, मुलभूत हक्क व प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठीचा मोर्चा अली नगर येथील शाखेच्या नामफलका पासून काढण्यात आला, व सदरील मोर्चा मुख्य मागण्याला अनुसरून घोषणाबाजी करत, नगर परिषद कार्यालयावर धडकला, या मोर्चाचे नेतृत्व प्रहारचे अली नगर शाखा प्रमुख अय्युब शाहा शब्बीर शाहा व क्रांती नगर शाखा प्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनीर यांनी केले, तर जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख नरेश जोगदंड, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, शहरप्रमुख संजय वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून, नगर परिषदेच्या संबधित अधिकाऱ्यांसोबत निवेदन देऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीची चर्चा केली, जन आक्रोश हंडा लोटा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सय्यद मुनीर सय्यद शब्बीर, सलीम सिकंदर शाहा, सिराज शाहा, हुसेन शाहा, एजाज शाहा यांनी परिश्रम घेतले तर अली नगर क्रांती नगर शाखा पदाधिकारी यांच्या सह असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या