🌟पुर्णा तालुक्यातील मौजे कांनडखेड येथे जबरी घरफोडी : अज्ञात चोरट्यांनी पळवला ०१ लाख १५ हजाराचा मुद्देमाल...!


🌟कानखेड गाव परिसरात भितीचे वातावरण : पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह ?🌟

पुर्णा (दि.२१ जुन २०२३) - पुर्णा-ताडकळस मार्गावरील असलेल्या मौ.कानखेड येथे घरातील मंडळी घराच्या छतावर झोपल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोंडून घरातील अलमारीत असलेली रोख रक्कमेसह दागदागीने असा ०१ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना दि.२० जुन ते आज बुधवार दि.२१ जुन २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटने मुळे कानखेड गाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियते मूळे तालुक्यात चोऱ्याचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे

या घटने संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील मौजे कानडखेड क्रमांक ०१ मध्ये राहणारे शेतकरी गोविंद नागोराव वाळवंटे हे दि.२० जुन रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबा सोबत रात्रीचे जेवण करून आपल्या घरास कुलुप लावून सहकुटुंब छतावर जाऊन झोपले होते तेव्हा याचा फायदा घेत दि.२० जुन ते आज बुधवार दि.२१ जून २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोंडून घरात प्रवेश करून कपाटात बांधकामासाठी ठेवलेले नगदी ५० हजार हजार रुपयें आणि सोन्याचांदीचे दागिने असे मिळून एकून ०१ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनाची माहिती गावात पसरल्याने गावातील लोकांची अक्षरशः झोप उडाली असून गाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान स्थानिक पोलिसांचा वचक नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चोऱ्याचे सत्र सुरू केल्याची चर्चा होऊन त्वरित पूर्णा पोलीस निरीक्षक सुभाष माडकर यांची बदलीची मागणी पुढे येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या