🌟पुर्णेतील बहुजन मुक्ति पार्टीने केली राज्यपालांकडे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी....!


🌟महिलांवर,मागास्वर्गीय,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्यांना गृहमंत्री जवाबदार🌟

पुर्णा (दि.१५ जुन २०२३) - येथील बहुजन मुक्ति पार्टी पुर्णा युनिट कडून आज गुरुवार दि.१५ जुन २०२३ रोजी राज्याचे राज्यपाल यांना पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या निवेदन पाठवून महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसापासून सातत्याने महिलांवर, मागास्वर्गीयांवर,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक यांवरील वाढते अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री मा.ना,देवेंद्र फडणवीस यांना जवाबदार धरुन त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

 बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की राज्यात विविध भागात झालेल्या जातीय दंगलींमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे केवळ १५ दिवसाच्या कालावधी मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराच्या घटना घडलेल्या असल्याचे म्हटले असून निवेदनात नांदेड येथील बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव या तरुणाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याची निघृण हत्या करण्यात आली अद्यापही त्याच्या खुनाचा तपास करण्यात पोलीस प्रशासनास यश आलेले दिसत नाही असे म्हटले असून दक्षिण मुंबई मधील चर्नी रोड भागात असलेल्या सावित्री फुले वसतिगृहात हिना मेश्राम या विद्यार्थिनीचा बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली. सरकारने वसतिगृह सुरक्षा रक्षकांची भरती बंद केल्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. तर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबचे स्टेटस ठेवल्यावरून बंद पुकारला व या बंदला रोखण्यासाठी पोलिसांना अपयश आले त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरिरत्न तबधाले या मातंग बांधवाला ३ हजार रुपयाचे २० हजार रुपये भरूनही खाजगी सावकाराने मिरची पूड डोळ्यात टाकून बेदम मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार पोलीसांकडे केली असता पोलीसात; मध्यवती टपाल शीसात तक्रार करण्याची हिम्मत कशी झाली" म्हणून त्या मातंग तरुणाची हत्या करण्यात आली तर गेल्या ४०० वर्षाच्या इतिहासात कधीही घडली नाही ती गोष्ट आळंदीमध्ये घडली जे वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने दरवर्षीची वारी नित्यनियमाने पूर्ण करत असताना आळंदीमध्ये त्या वारीवर पोलीसांनी लाठी हल्ला केला हि मानवतेला काळिमा फासणारी गोष्ट आहे, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा अशापद्धतीने अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला नव्हता असे निवेदनात म्हटले आहे.

वरील घटनांकडे बघता राज्यामध्ये जे जातीयवादी सरकार आलेले आहे ते जाणीवपूर्वक महिलांवर,मागास्वर्गीयांवर,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक आणि बहुजनांच्या हितसंबंधांच्या विरोधातील विचारधारां व ध्येय धोरणं असणार सरकार आहे असे सिद्ध होत आहे. वरील घटनांवरून सिद्ध झालेले आहे हे सरकार राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी झालेले आहे राज्यातील वातावरण, सामाजीक सलोखा व ऐक्य या सरकारच्या विषारी जातीवादी धोरणामुळे भयंकर दूषित झाले आहे. याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हेच आहेत. अशी तमाम बहुजन समाजाची खात्री झाली आहे त्यामुळे सर्व घटनांना गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्यामुळे त्यांनी स्वतःची जबाबदारी समजून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व हे जातीवादी सरकार बरखास्त करण्यात यावे अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी त्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही असाही इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला असून या निवेदनावर बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष भिमराव  वावळे,तालुका प्रभारी विठ्ठल पिराजी साखरे,सामाजीक कार्यकर्ते रत्नादिप राजभोज,सामाजीक कार्यकर्ते लक्ष्मण जयराम गायकवाड,युवा नेतृत्व पवन गंगाधर साखरे आदींच्या स्वाक्षरी आहेत...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या