🌟सर्वसामान्य जनता अन्न व औषधी प्रशासनाला म्हणतेय 'भिक नको निदान भेसळीच्या कारभारावर जगणार कुत्र तरी आवर'🌟
🌟जिल्ह्यात सर्वत्र भेसळयुक्त दुध दही तुप खवा आदींसह भेसळयुक्त खव्यापासून निर्मित मिठाईची विक्री :-
परभणी जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्याचा समावेश असून यात पुर्णा,पालम,गंगाखेड,मानवत,सेलू,जिंतूर,सोनपेठ,परतूर या तालुक्यांमध्ये असंख्य खाजगी दुध डेअरींतून प्रती लिटर ७० ते ७५ लिटर प्रमाणे भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात आहे दुध ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने दुध खरेदी करुन सुध्दा भेसळयुक्त दुध घ्यावे लागत असल्याने या दुधाचे आरोग्यावर दुष्परिणाम होतांना पाहावयास मिळत आहेत तर गावरान तुपाच्या नावावर विक्री होत असलेल्या तुपाला प्रती किलो ८००/-रुपये मोजून देखील या तुप विक्रेत्यांकडून भेसळयुक्त तुप खरेदी करावे लागत आहे.
🌟राज्यात खुल्या गोडतेल/खोबरे तेलावर बंदी असतांना देखील मोठ्या प्रमाणात या तेलांची खरेदी/विक्री :-
भेसळयुक्त खाद्य तेलासह खोबरेतेल विक्री होता कामा नयें याकरिता शासनाने खुल्या तेलावर प्रतिबंध करीत पाकीटबंद खाद्य तेलाची विक्री करण्याचे आदेश जारी केले असतांना देखील सर्वत्र खुल्या भेसळयुक्त आरोग्यास अपायकारक असलेल्या तेलांची विक्री केली जाते कशी ? असा प्रश्न उपस्थित होत असून या भेसळयुक्त खाद्य तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात लहान/मोठे हॉटेल चालक गाड्यावर खाद्य पदार्थ विक्रेते तसेच धाबे चालक करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ खेळला जात असतांना अन्न व औषधी प्रशासन झोप घेत आहे का ? असा प्रश्न जिल्ह्यात सर्वत्र उपस्थित होत आहे.
🌟जिल्ह्यात सर्वत्र चालणाऱ्या स्विटमार्ट/बेकरी आदींवर भेसळयुक्त निकृष्ट मिठाईसह केकची विक्री :-
परभणी जिल्ह्यात अंतरराज्यातून आलेल्या स्विट मार्ट चालकांकडून स्विट मार्टवर भेसळयुक्त दुधापासून बनवलेल्या अत्यंत निकृष्ट व मानवी आरोग्यास अपायकारक मिठाईसह निकृष्ट दर्जाच्या केकची देखील विक्री करून सर्रास फसवणूक केली जात असल्याचे देखील गंभीर प्रकार समोर येत असतांना जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्रेत्यांशी कोणते हितसंबंध जोपत आहेत ? असा गंभुर प्रश्न ग्राहक वर्गात सर्रास उपस्थित होतांना पहावयास मिळत आहे.
🌟फळ पिकवण्यासाठी तसेच फळांचा रंग बदलण्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या केमीकलचा वापर :-
परभणी जिल्ह्यात फळ विक्रेत्यांकडून सर्रास फळ पिकवण्यासाठी तसेच फळांचा रंग बदलण्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या केमीकलचा तसेच औषधींचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असून याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतांना पाहावयास मिळत आहे परंतु याकडे देखील परभणी जिल्हा अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासन अस्तित्वात आहे की नाही ? असा देखील प्रश्न ! उपस्थित होतोय.....
0 टिप्पण्या