🌟परभणी जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सांख्यिकी दिन उत्साहात....!


🌟सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा.प्रशांतचंद्र महालनोबीसांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 'सांख्यिकी दिन' म्हणून साजरा होतो🌟 

परभणी (दि.२९ जुन २०२३) : स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पद्धतीचा विकास यामध्ये सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन दरवर्षी 'सांख्यिकी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

सांख्यिकी दिनाचा मुख्य उद्देश सामाजिक व आर्थिक नियोजन आणि धोरणांची आखणी यामधील सांख्यिकीचे महत्त्व व त्या अनुषंगाने स्व. प्रा. महालनोबीस यांच्या कार्यातून जनतेमध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी, युवावर्गाने त्यातून प्रेरणा घ्यावी हा आहे. हा दिवस राष्ट्रीयस्तरापासून ते अगदी जिल्हास्तरांवर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा सांख्यिकी कार्यालय परभणी येथे जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती परभणी येथील सहायक संशोधन अधिकारी बाळासाहेब भिसे, धम्मपाल कांबळे, नागेश कुलकर्णी, श्री.लोखंडे हे उपस्थित होते तर सांख्यिकी सहायक  संजय भोसले, श्री.गवळी उपस्थित होते. तर अंशकालीन भावसंकलक द. जि. गडदे, मा. ना. देवकते, नंदकिशोर रत्नपारखे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. 

कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सांख्यिकी सहायक म. द. जाधव, गोविंद बकान, सुधाकर वानखेडे यांच्यासमवेत चं. सो. गायकवाड यांनी परिश्रम घेतले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या