🌟परभणी तालुक्यातील पिंगळीतील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी द्वितीय मेळावा संपन्न....!


🌟या मेळाव्याचे उदघाटन शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष शेख नाजेर यांच्या हस्ते करण्यात आले🌟


परभणी (दि.२० जुन २०२३) - परभणी तालुक्यातील पिंगळी येथील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मंगळवार दि.२० जुन २०२३ रोजी शाळा पूर्व तयारी द्वितीय मेळाव्याचे आयोजन केंद्राचे केंद्र प्रमुख अण्णासाहेब जल्हारे व माजी केंद्र प्रमुख हनुमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

 या मेळाव्याचे उदघाटन शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष शेख नाजेर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यास शालेय व्यवस्थापण समिती सदस्य व शिक्षक पालक समिती अध्यक्ष शेख तकसीर व सदस्य व पालक उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन मुलांचे सत्कार केले या कार्यक्रमासाठी पहिलीच्या वर्ग शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या