🌟सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत प्रवेश उत्सव संपन्न.....!


🌟यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले🌟


 
सोनपेठ (दि.१७ जुन २०२३) :- जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळीची आरास मांडत ढोल ताशाच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये आपली शाळा कन्या शाळा, बेटी पढाव बेटी बचाव, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्या, आदी घोषणा देत शहर दनानून सोडले,यावेळी प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात सर्व वर्गातील एका एका विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये स्वप्निल सोमेश्वर शिंदे व जयराज श्रीनिवास मुंढे इयत्ता पहिली नविन प्रवेश तर अब्दुल रेहान खाजा शेख इयत्ता 5 वी प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनपेठ येथुन तसेच नवीन शिक्षक दत्ता पवार,रमेश राठोड व नवीन शिक्षिका मंगल कोटलवार यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या प्रवेश उत्सवात मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, अमोल गोरे, कल्याण राठोड, रामेश्वर राऊत, केशव पांचाळ, रमेश राठोड, दत्ता (डी.के.) पवार, मंगल कोटलवार, तृप्ती म्हात्रे, रंजना डोंगरे, सुनीता जोशी, दिपयंती माळी मॅडम व बाबासाहेब मस्के यांनी परिश्रम घेतले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या