🌟पुर्णा तालुक्यातील नदीपात्रात गौण खनिज तस्करांकडून जेसीबीने अवैध चोरट्या रेतीसह आता मातीचेही उत्खन...!


🌟उपविभागीय अधिकारी जीवराज डापकरांच्या कचाट्यातून अवैध रेती तस्कर सुटले माती तस्कर मात्र कचाट्यात अडकले🌟

पुर्णा (दि.१० जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रात गौण खनिज तस्करांच्या टोळ्या खुलेआम जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात बेकायदेशीररित्या गौण खनिज रेती/मातीचे उत्खनन करीत असतांना स्थानिक तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्यासह महसुल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी मुग गिळून बसले के भुईमुग ? असा प्रश्न उपस्थित होणारी घटना आज शनिवार दि.१० जुन २०२३ रोजी सकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील सातेगाव येथील पुर्णा नदीपात्रात घडली अवैध रेती उत्खननासह अवैध रेती तस्करांच्या मागोवा घेत पुर्णा तालुक्यातील  सातेगावात आलेल्या उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना येथील नदीपात्रात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बिना परवाना अवैध माती उत्खनन व वाहतुक करतांना दोन हायवांसह एक जेसीबी मशीन देखील आढळून आली.

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या सोबत तहसिलदार बोथीकर,मंडळ अधिकारी के.पी.शिंदे,तलाठी तुपसमींदरे,गोडबोले यांना सोबत घेऊन उपविभागीय अधिकारी डापकर यांनी दोन हायवा एक जेसीबी मशीन ताब्यात घेतली यावेळी नदीपात्रात रेती उपसा करण्यासाठी वापरले जाणारे सेक्शन पंप,पाईप,तराफे आदी साहित्य घटना स्थळावर जाळू नष्ट करण्यात आल्याचे समजते उपविभागीय अधिकारी डापकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केलेले दोन हायवा व एक जेसीबी मशीन चुडावा पोलिस स्थानकात लावण्यात आले.

दरम्यान या घटनेवरुन असे निदर्शनास येते की पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांमध्ये आता अवैध रेती तस्करांसह अवैध माती तस्करही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असतांना स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील  अधिकारी/कर्मचाऱ्यांसह गाव परिसरातील सरपंच/ग्रामसेवक आपल्या जवाबदारीचे भान विसरले की काय ? जर संबंधित अधिकारी/कर्मचारी आपल्या जवाबरीचे भान विसरून गौण खनिज तस्कर माफियांना पाठीशी घालून लाखो रुपयांच्या शासकीय महसुलाची धुळधान करीत असतील तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी ना ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या