🌟माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे केला सत्कार🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर (दि.१८ जुन २०२३) : कष्टातून घेतलेल्या शिक्षणाचे पाळेमुळे खोलवर जात असतात. सतत अभ्यास करून मंठा तालुक्यातील लिमखेडा गावातील युवक ओम राठोड या विद्यार्थ्यांने अभ्यासाची चिकाटी धरून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविले. नीट परीक्षेत ७२० गुना पैकी ६९० गुण संपादन केल्याचे कौतुक जिंतूर-सेलू मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले.
या दरम्यान ओम राठोड चे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावी डॉ. म्हणून पुढील वाटचालीसाठी माजी आमदार भांबळे यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नियमित अभ्यास करून जी मुले पुढे गेलेली आहेत तशा विद्यार्थ्यांना अनुभव देखील चांगलाच मिळतो असे आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपली पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आव्हान यावेळी भांबळे यांनी केले. या याप्रसंगी जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथील सरपंच पवन जाधव यांच्या मित्र मंडळाने ओम राठोड व त्यांचे वडील श्याम राठोड यांचा सत्कार केला. मुळातच हुशार असलेल्या ओमनी डॉक्टर होण्याची स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेत अहोरात्र मेहनत करून घवघवीत यश संपादन केले. या यशाच्या वाट्यात आई-वडील व माझे मामा संक्राळा गांवचे सरपंच पवन जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ओमने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
दरम्यान याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वनाथ राठोड, प्रसादराव बुधवंत, मनोजराव थिटे, बाळासाहेब बुधवंत, विजयभाऊ खिस्ते, गजानन चव्हाण, सरपंच पवन जाधव ज्ञानेश्वर देशमुख दिनकर आलटे कोराडी, शिवाजी बनगर, नारायण राठोड, प्रल्हाद चव्हाण, मोहन राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, सोपान चव्हाण, विजय जाधव या सह आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते....
0 टिप्पण्या