🌟शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खानांच्या सत्काराला पाथरीत पुर्णेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ?


🌟पुर्णा शहरात चर्चेला उद्यान : राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळाचा त्याग करुन खानांच्या संगतीन बाण हाती घेणार का ?🌟

परभणी/पुर्णा : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक व शिवसेना शिंदे गटाचे गब्बर नेते सईद खान यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आज रविवार दि.२५ जुन २०२३ रोजी दुपारी ०२-०० वाजता पुर्णा नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगर सेवक शेख चाँद शेख सुभान बागवान व मधुकर गायकवाड,माजी नगरसेवक शशीकांत जगताप माजी नगरसेवक शशीकांत गायकवाड यांनी त्यांची पाथरी येथे त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा जंगी वाढदिवस सोहळा साजरा करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करण्याचे संकेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळाचा त्याग करीत 'खानांच्या संगतीन धनुष्य बाण हाती घेऊन' शिवसेना शिंदे गटाला बळकटी देण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगर सेवक शेख चाँद शेख सुभान बागवान व मधुकर गायकवाड,माजी नगरसेवक शशीकांत जगताप माजी नगरसेवक शशीकांत गायकवाड या चार आजी/माजी दिग्गज नगरसेवकांनी दिल्यामुळे आगामी काळात पुर्णा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली असून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात येत्या दि.०८ जुलै २०२३ रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याचे संकेत मिळत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या