🌟परभणीत ध्वनी प्रदुषण करणार्‍या वाहनधारकांच्या जप्त केलेल्या सायलेंन्सरवर पोलिसांनी चालवले रोड रोलर...!


🌟कारवाईत जवळपास 445 सायलेन्सर पोलिसांकडे जमा झाले होते🌟 

परभणी (दि.१७ जुन २०२३) : परभणी शहरासह जिल्ह्यात ध्वनी प्रदुषण करणार्‍या वाहनधारकांच्या विरोधात वाहतूक पोलिस प्रशासनाने केलेल्या जप्ती कारवाईतील सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवून ते सायलेन्सर नष्ट केले.

          शहरासह जिल्ह्यात पोलिस यंत्रणेने ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात मोठी मोहिम राबविली. त्यातून वाहनधारकांना दंड तसेच त्यांच्या वाहनांचे सायलेन्सरही जप्त केले. जवळपास 445 सायलेन्सर पोलिसांकडे जमा झाले होते. त्याची किंमत अंदाजे 13 लाख 50 हजार एवढी होती. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून जप्त केलेल्या सायलेन्सरचा साठा नष्ट करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरु केली. पोलिस अधिक्षक श्रीमती आर. रागसुधा, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस उपअधिक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलिस उपनिरीक्षक मकसुद पठाण, राजेश्‍वर जुक्टे, काझी, कच्छवे, लहाणे, जाफर, पवार, देशमुख, पाडोळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी हा साठा नष्ट करण्याच्या दृष्टीने रोडरोलर मागवून तो साठा नष्ट केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या