🌟पुर्णा शहरातील क्रांतीनगर व अलिनगर येथे नागरी सुविधा पुरवण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी....!


🌟मागण्या मान्य नाही झाल्यास दि.26 जून रोजी नगर परिषद कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा🌟

पुर्णा (दि.२० जुन २०२३) : नगरपालिकेच्या हद्दीतील क्रांतीनगर व अलिनगर ही लोकवस्ती नांदेड व हिंगोली कड़े जाणाऱ्या रेल्वे लोह मार्गाच्या लगत आहे, येथील वास्तव्यास असलेले स्वसामान्य गोरगरीब है अनेक वर्षानपासून नागरी सुविधा पासून वंचित आहेत, येथील लोकवस्तीत सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्यामुळे वास्तव्यास असलेल्या महिला व अबालवृद्धांना शौचासाठी जीव मुठ्ठीत घेऊन नाईलाजास्तव रेल्वे लोहमार्ग ओलांडून जावा लागतो अशा वेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथील लोकवस्तीत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी गळती होत असल्याने नळाद्वारे लोकवस्तीत होणारा पाणी पुरवठा सुरळीत होत नसून अनेकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही, अशाप्रसंगी येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत सार्वजनिक असलेल्या बोरवर गेल्यास बोर शेजारी राहणारयांनी सार्वजनिक बोरवर अनधिकृत कब्जा करून बसल्याने अनेकांचे पिण्याच्या पाण्याविना बेहाल होत आहेत, येथील लोकवस्तीतील अनेक विद्युत पोलवर पथदिवे नसल्याने आबालवूद्धंना अंधाराचा सामना करावा लागतो, क्रांतीनगर व अलिनगर या लोकवस्तीत घंटा गाड़ीची फेरी कधीच येत नसल्यामुळे येथील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, येथील वास्तव्यास असलेल्या अनेकांनी राहण्यासाठीची जागा नोटरी द्वारे विकत घेतलेली असतांना सदरील राहती जागा नामांतर झालेली नसून रिव्हिजन दप्तरी नोंद नाही, येथील वास्तव्यास असलेल्या अनेक गोरगरिब कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही यामुळे अनेक गोरगरिबांचे वास्तव्य कच्च्य घरे अनेक बेघर कुटुंब उघड़्यावर वास्तव्य करीत आहेत, व तसेच  शहरातील झाकीर हुसेन चौक येथे मुसाफिर खाना असून  तो अतिक्रमणच्या विरखळ्यात आहे तेथील जागा मोकळी करून  मुसाफिरखानयाला याला डाग डुगी  करून दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन दि.19 जून रोजी मुख्यअधिकारी यांना निवेदनात केली आहे तसेच  मागण्या मान्य नाही झाल्यास दि. 26 जून रोजी नगरपरिषद कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात नमूद केला आहे त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहरप्रमुख संजय वाघमारे  शाखाप्रमुख आयुब शहा  शब्बीर शहा  शब्बीर शहा सिकंदर शहा सय्यद मुनीर सय्यद शबीर अकबरी बेगम सय्यद मुनीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या