🌟परभणी महानगर पालिका हद्दीतील मुख्य जलवाहिणी फुटल्याने शहरात पुन्हा निर्जळी...!


🌟महानगर पालिकेकडून युध्दपातळीवर मुख्य जलवाहिणी दुरुस्तीचे काम सुरु🌟

परभणी (दि.१३ जुन २०२३) : महानगरपालिका हद्दीतील अमेय नगर भागातील जलकुंभाजवळील मुख्य जलवाहिणीच फुटल्याने अन्य जलकुंभांना होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.

             अमेय नगरातील जलकुंभावरुन ममता कॉलनी व राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभास पाणी पुरवठा होतो. परंतु, अमेय नगरातील मुख्य जलवाहिणीच बुधवारी रात्री फुटल्याने ममता कॉलनी व राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभांना होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला. महापालिकेच्या पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरु केले खरे, परंतु, गुरुवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, या नव्याने उद्भवलेल्या पेचप्रसंगामुळे परभणीकरांना पुन्हा निर्जळी अनुभवावी लागणार, अशी चिन्हे आहेत.

             गेल्या आठवड्यातच वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे तब्बल चार दिवस परभणीकरांना निर्जळी अनुभवावी लागली. आता जलवाहिणीच फुटल्याने पुन्हा दोन दिवस पाणी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. महापालिका प्रशासनाने या बाबत कोणताही खुलासा केला नाही. परंतु, शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा अंदाज आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या