🌟नांदेड येथील कामठा (बु.) येथे एसबीआयची नवीन शाखा सुरू करावी - रणजीतसिंघ कामठेकर


🌟एसबीआयच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथे आयोजित रोजगार आणि कर्ज मेळाव्यात ते बोलत होते🌟

✍🏻सुधीर प्रधान - नांदेड

 नांदेड (दि.१९ जुन २०२३) -आसपासच्या दहा गावातील शेतकरी आणि महिला बचत गटांच्या  सोयीसाठी कामठा बुद्रुक येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी गावचे उपसरपंच स.रणजीतसिंघ कामठेकर यांनी केली. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आणि कर्ज मेळाव्यात ते बोलत होते.

 आपला स्व अनुभव कथन करत,कामठेकर यांनी कामठा आणि आसपासच्या १० गावातील शेतकऱ्यांना तसेच येथील  गटात बचत गटातील महिलांना लांबवरच्या बँकेच्या शाखांमध्ये  होणारी ससेहोलपट आणि त्रास कथन केला. ते पुढे बोलताना म्हणाले की,केंद्र शासनाने बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हीतासाठी राबवलेल्या  योजना पूर्णपणे प्रभावी नाहीत शासनाने प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या त्याच्या एकूण जमिनीच्या सरकारी मूल्याच्या २५% रक्कम किमान पाच वर्षासाठी त्या शेतकऱ्याच्या नावावर बँकेत कॅश क्रेडिट स्वरूपात जमा ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळी किंवा इतर कोणत्याही अडचणीच्या वेळी पीक कर्ज किंवा खाजगी कर्ज यासाठी त्रासदायक परिस्थितीतून जावे लागणार नाही.असे केल्यास संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही असा दावाही कामठेकर यांनी यावेळी केला. आवश्यकता असल्यास अशा पंचवीस टक्के कॅश क्रेडिटसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने गहाण ठेवून घ्याव्यात,पण ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. दर पाच वर्षाला या योजनेचा आढावा घेण्यात यावा.तसेच जमिनीच्या  वाढीव मूल्य दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या कॅश क्रेडिटच्या रकमेत वाढ करावी असेही त्यांनी सुचवले.

 भारतीय स्टेट बँकेने नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना यासारख्या अनेक योजना नागरिकांसाठी तयार केल्या आहेत . त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या  जनरल व्यवस्थापक मेरी सगया धनपाल यांनी यावेळी केले त्यापुढे त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना मध्ये वर्षाला वीस रुपये भरणा केला,तर दोन लाख रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेत ४३६ रुपये वर्षाला भरले,तर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये विमा मिळतो. मुद्रा योजना याविषयीही त्यांनी माहिती दिली यावेळी डीजीएम प्रिया कुमार, व्यवस्थापक संहेता, सुवर्णा कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास अर्धापूर शाखा व्यवस्थापक सुनील  गुगल, रीजनल मॅनेजर पी कालिदासु, सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे, डॉ.विनोद जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडी सेविका संगीता बरगळ, गंगाबाई दासे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कंगारे यांनी केले. तर सुवर्णमाला  कांबळे यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या