🌟पुर्णेतील श्री.दत्त मंदिर संस्थान लगतची 'गटार गंगा' वाहतेय रस्त्यावर : भावीकांची तारांबळ....!


🌟भाविकांनी केली 'गटार गंगेवर उड्डाणपुलाची मागणी' ? स्वच्छता करण्याची ऐपत नसलेले न.पा.प्रशासन उड्डाण पुल बांधणार काय ?🌟

पुर्णा (दि.१८ जुन २०२३) - महाराष्ट्र शासनासह केंद्र शासनाकडून देखील आरोग्य व स्वच्छतेवर भरघोस निधी प्राप्त झाल्यानंतर देखील आलेल्या निधीचा सद्उपयोग न करता स्वच्छतेच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा अपहार करून शहर परिसरात अस्वच्छते प्राधान्य देत जनसामान्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा खेळ करण्याचा निर्लज्जपणा नगर परिषद प्रशासनाने चालवला असल्याचे आज रविवार दि.१८ जुन २०२३ रोजी पुन्हा एकदा उघड झाले असून शहरातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.दत्त मंदिर लगतची नाली नगर परिषद स्वच्छता विभागाने स्वच्छ न केल्यामुळे या नालीतील अस्वच्छ पाणी पाहता पाहता अक्षरशः रस्त्यावरून वाहू लागले आणि या पाण्याला गटार गंगेचे स्वरुप प्राप्त झाले यावेळी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांची अक्षरशः तारांबळ उडाल्यामुळे व भाविक भक्तांना या गलिच्छ पाण्यातून जावे लागत असल्यामुळे मंदिराची पावित्र्यता भंग होत असल्याने अनेकांनी तर असेही म्हटले की नगर परिषद प्रशासनाच्या स्वच्छता विभागाची नाली साफसाफाई करण्याची ऐपत नसेल तर या वाहणाऱ्या 'गटार गंगेवर' निदान उड्डाण पुल तरी बांधून द्यावे ?  


पुर्णा शहरातील मध्यभागी व अत्यंत उच्चभ्रू वसाहत असलेल्या सराफा बाजार परिसरातील मागील बाजूस असलेल्या या श्री.दत्त मंदिर देवस्थान परिसरातील स्वच्छतेच्या कारणावरून मागील चार महिन्यापुर्वी फेब्रुवारी महिन्यात याच परिसरातील स्वच्छतेच्या कारणावरुन माजी नगर सेवक व नगर परिषद स्वच्छता विभागात वाद झाला होता या घटनेला चार महिने उलटून देखील या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाचा निष्क्रिय व निर्लज्ज कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यामुळे या परिसरातील नागरिक या दत्त मंदिरात प्रवेशासाठी या मंदिरा समोरुन वाहणाऱ्या 'गटार गंगेवर' उड्डाण पुल बांधण्याची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.....    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या