🌟मानवत कृषी उत्पन्न बाजार समीतीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा झेंडा फडकला...!


🌟शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी पंकज अंबेगावकर पॕनलचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकला🌟

परभणी (दि.११ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न  बाजार समीती निवडणुकीत १८ जागा पैकी १० जागा मा.सईद खान यांच्या पॕनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आ.सुरेशराव वरपुडकर,राष्ट्रवादी काँग्रेस नेते आ.बाबाजानी दुर्रानी,खा.संजय जाधव यांना ०७ जागा तर मा.दत्तराव जाधव यांना ०१ जागा मिळाली शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासु परभणी जिल्हा शिवसेना नेते सईद खान यांनी शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व सिध्द केले. 

मानवत बाजार समिती निवडणूकीत आ.मेघनाताई बोर्डीकर,मा.आ.मोहन फड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी माजी सभापती पंकज आंबेगावकर पॕनलला १८ पैकी १० जागेवर विजय मिळाल्याने विरोधी प्रस्थापितांचा धुवां ऊडाला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या