🌟आधार कार्ड अद्ययावत न केल्यास भविष्यात पिक विमा,पीएम किसान,महाडीबीटी,बँकिंग कामांसाठी अडचणी येणार🌟
परभणी (दि.८ जुन २०२३) : लोकाभिमुख विविध शासकिय योजनांसह आवश्यक सेवांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांच्या आधार कार्डला १० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा कार्ड धारकाने ते अद्ययावत करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.
आधार कार्ड अद्ययावत न केल्यामुळे भविष्यात पिक विमा,पीएम किसान, महाडीबीटी, बँकिंग इ.कामांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधारकार्ड अद्ययावत करून घेण्यासाठी जवळील आधार केंद्रावर, बँक, पोस्ट ऑफिस किंवा अंगणवाडी येथे जाऊन ते केवळ ५० रुपयांमध्ये अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या