🌟जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाझर तलावातील गाळ काढताना आढळल्या तलावात बुध्दाच्या प्राचीन मूर्ती...!


🌟बौध्द सामाज बांधवांनी भीम वंदना करत विहाराची केली मागणी🌟


जिंतूर (दि.२० जुन २०२३) - जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील पाझर तलावात गाळ काढण्याचे काम चालू असताना खोदकामा दरम्यान प्राचीन मूर्ती व काही कोरीव खांब आढळून आले आहे ही घटना दि.१८ जून २०२३ रोजी उघडकीस आली आहे दरम्यान बौध्द सामाज बांधवांनी भीम वंदना करत विहाराची मागणी केली आहे तर या घटनेमुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

गावकऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,जिंतूर यलदरी रस्त्यावर माणकेश्वर का शिवारातील शेतात सार्वजनिक पाटबंधारे विभाग च्या वतीने 1972 च्या दुष्काळात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने मागील 40 वर्षांपूर्वी पाझर तलावाचे काम करण्यात आले होते यावेळी पाझर तलावाच्या बँक वॉटर मध्ये जुने हेमाडपंथी महादेवाचे मंदिर होते या मंदिरात पाणी जात असल्यामुळे पूर्वीच्या गावकऱ्यांनी जुन्या मंदिरातील मूर्ती व काही अवशेष काढून तलावाच्या काठावर मंदिर स्थापन केले होते सध्या तलावातील गाळ काढण्याचे काम जेसीबीच्या माध्यमातून चालू आहे याचं दरम्यान खोदकाम करताना प्राचीन मुर्त्या आढळून आल्या आहेत यामध्ये दगडावर कोरलेल्या काही बुध्दाच्या मुर्त्या आहेत तर मंडपाचे शिलालेख, प्राचीन बारव आहेत मुर्त्या संपडलेल्या ठिकाणी पोलीस व महसूल प्रशासनाने भेट दिली असून गावकऱ्यांनी पुरातत्व विभागास माहिती दिली असल्याचे समजते असून बुध्दाच्या मुर्तीया सापडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होताच बोध्द समाज बांधवांनी या तलावात एकच गर्दी केल्याचे दिसत आहे दरम्यान दि.19 जून रोजी अनेक महिलेच्या उपस्थित सामुहिक बौध्द वंदना करण्यात आल्याचे समजते.

******************************************

परभणी जिल्हा बुध्द विहार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष खंदारे, तालुका अध्यक्ष आशाताईं संभाजी खिल्लारे, कैलास खिल्लारे, वंदनाताई बंड,दशरथ भिसे, उमाजी वाकळे,प्रकाश खिल्लारे आदींच्या पथकाने तलावात भेट देऊन पाहणी करून जिल्हाध्यक्ष एन.जी खंदारे यांनी सांगितले की भगवान बुद्धाच्या ध्यान अवस्थेतील सदृश्यमूर्ती सापडली आहे सदरच्या ठिकाणी बुद्धकालीन व सम्राट अशोक कालीन अवशेष आणखी सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुरातत्व विभागाने शासनाकडून परवानगी घेऊन या तलावात बारकाईने संशोधन व संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदन जिल्हा प्रशासनाला देणार असल्याचे माहिती दिली.

* माजी सरपंच शिवाजी काकडे 

माणकेश्वर गावात जुने पुरातन हेमाडपंथी महादेव चे मंदिर या ठिकाणी होते 1972 साली तलावांचे काम सुरू झाल्याने मंदिरातील मूर्ती, शिलालेख प्रशासन व गावकार्याच्या मदतीने तलावाच्या काठावर मंदीर बांधून काही मुर्त्या स्थापन केल्या होत्या तर काही मुर्त्या, शिलालेख हे येथेच होते.बौध्द समाज बांधवांच्या मागणी बाबत दैनिक एकमत पत्रकार शेख अलीम यांनी प्रश्न विचारले असता त्यांचे म्हणणे होते की शासन प्रशासन, पुरातत्व खात्याच्या संशोधना नंतरचं सत्य काय ते समोर येईल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या