🌟पुर्णेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकादशी निमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन : भव्य पालखी सोहळाही होणार....!


🌟स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन🌟


पुर्णा (दि.२७ जुन २०२३) - पुर्णा शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दि.२९ जुन २०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य आषाढी महोत्सवासह दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित या आषाढी महोत्सवात सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास 'पांडुरंगाच्या पालखीसह दिंडीचे' आयोजन करण्यात आले आहे या आषाढी महोत्सवाचे आयोजक व स्वातंत्र्य सैनिक कै.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी 'आषाढी एकादशी' निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून पालखी सोहळ्यासह दिंडीची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे सदरील पालखी सोहळ्याच्या भव्य मिरवणूकीला शहरातील नवा मोंढा येथून सुरुवात होणार असून नवा मोंढा,हनुमान मंदिर,छत्रपती संभाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक,शिवतिर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक,संत नरहरी महाराज चौक,शहिद सरदार भगतसिंघ चौक,छत्रपती शिवाजी महाराज नगरातील महादेव मंदिर देवस्थान,भवानी माता चौक,श्री गुरुबुध्दी देवस्थान परिसर,महाराणा प्रतापसिंह चौक,श्री.दत्तमंदिर देवस्थान परिसर अश्या प्रकारे संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून सदरील भव्य पालखी सोहळा व दिडी मिरवणूक जुना मोंढा परिसरात पोहोचल्यानंतर येथे 'भव्य रिंगन सोहळा' पार पडल्यानंतर मिरवणूक विसर्जीत होणार आहे.......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या